मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये एम/पूर्व विभागातील असंघटित क्षेत्रातील कामगारावर फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये बांधकाम मजूर, घरकाम करणारे महिला सफाई कामगार नाका कामगार वाहन चालक या कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण आली आहे.
संकल्प संस्थेच्या एक हात मदतीचा या प्रकल्प अंतर्गत एम/पूर्व विभागातील चेंबूर शिवाजी नगर गोवंडी विभागातील राहणारे संघटित कामगार येथील २०० कुटूंबाला संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या पुढाकाराने तसेच ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन च्या माध्यमातून रेशन किट वाटप करण्यात आले.

सर्व सरकारी नियमांचे पालन करून रेशन वाटप करण्यात आले. सुरक्षित अंतर, तोंडाला मास्क तसेच कोरोना या विषयावर जनजागृती करून लोकांना मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी विशेष सहकार्य मनीषा शिंदे, राहुल डोगरे, अरूणा मोरे सविता हेडव्हे, वनिता सावंत, नजमा(राणी) शहा नसरीन शेख यांचे लाभले.




