औरंगाबादच्या वेगवेगळ्या भागातून चोरट्याने लांबवल्या दोन दुचाकी; गुन्हा दाखल

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – शहराच्या विविध भागातून वाहन चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्या आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सय्यद नवीन महरबी (वय ६०, रा.आरटीओ ऑफीस समोर) हे २६ रोजी रेल्वेस्टेशन रोडवरील वॉकींग प्लाझा येथे वॉकिंग करण्यासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. रोहिदास भानुदास गायकवाड (३४, रा.मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ) यांची दुचाकी चोरट्याने ३० मे रोजी घराजवळून चोरून नेली.

विविध भागातून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याविरुद्ध अनुक्रमे छावणी आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here