पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती, सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या मार्फत कोरोना योद्धा सन्मान पत्राचे वितरण
ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती, पोलीस बॉईज आयोजित रक्तदान शिबिर ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे, सिद्धार्थ डी जाधव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर हे सिद्धिविनायक हॉस्पिटल चे संचालक डॉ अमोल गीते यांच्यामार्फत दि. ३ जून आर.जे ठाकूर सभागृह सावरकर नगर ठाणे पश्चिम सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात सर्व गृहरक्षक दलातील ठाणे होमगार्ड, पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी ,संघटनेतील सर्व पदाधिकारी व इतर सर्वसामान्य नागरिक ,ज्येष्ठ नागरिक ,तरुण मुल ,मुली यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन आनंदाने रक्तदान केले.
रक्तदान शिबिर आयोजित करताना गोरगरिबांसाठी अन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम जीपी ग्रुप ऑफ ठाणे यांच्या मार्फत ठेवण्यात आला होता या अन्नदानाची उद्घाटन ठाणे नगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे साहेब यांच्या हस्ते अन्नदानाची सुरुवात करण्यात आली तसेच पोलीस कर्मचारी वाहतूक यांना अन्नधान्याची किट श्री सिद्धार्थ जाधव , श्री परेश शहा, श्री गिरीश शहा, श्री सतीश बनसोडे, सौ शोभना ओवाळ , श्री सुरज ओव्हाळ यांच्यामार्फत वाटप करण्यात आले विशेष बाब या अन्नदान कार्यक्रमांमध्ये मुंब्र्यातील व इतर भागातील तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदवून त्यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले नेहमी चांगल्या दर्जाचे अन्नदान करण्याचे काम जेडी ग्रुप ऑफ ठाणे नियमित करत आहे त्यांच्या या कार्याला महाराष्ट्र पोलीस, गृहरक्षक दल , पोलीस गृहरक्षक संघर्ष समितीचा नेहमी पाठिंबा राहील
सध्या या कोरोना वातावरणामध्ये अनेकांना रक्ताचा पुरवठा कमी भासत आहे लोकांमध्ये रक्तदानाची जागृती व्हावी, सध्याची परिस्थिती पाहता हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये आमदार मा.श्री संजय केळकर ,श्री निरंजन डावखरे आमदार ,मा श्री संदीप लेले, माजी महापौर मीनाक्षी पाटील, श्री हनुमत जगदाळे तसेच मनसेचे नेते, अनेक समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीने संघटनेतील रक्तदान शिबिराला भेट देऊन कौतुक केले.

रक्तदान शिबिरामध्ये मुंबईतील पोलीस गृहरक्षक संघर्ष समितीचे धीरज पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य , अमोल माने अध्यक्ष मुंबई , अमोल पटेकर सरचिटणीस मुंबई यांनी भेट देऊन रक्तदान शिबिराचा उत्साह वाढवला तसेच कोरोना कालखंडामध्ये गोरगरिबांना सेवा देणाऱ्या डॉक्टर नर्स सफाई कर्मचारी व इतर पक्षातील कार्यकर्ते नेते यांना कोरोणा योद्धा गौरव देऊन सन्मानित करण्यात आले व रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ अमोल गीते यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले.







