चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ओबीसी बद्दल असलेल्या उदासीन व ओबीसी विरोधी धोरणामुळे ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द करण्यात आले आहे. अश्या ओबीसी समाजाविरोधी महाविकास आघाडी सरकार चे निषेध करुन ओबीसी आरक्षण पुर्नस्थापीत करण्याच्या मागणीकरीता दि.3 जून 2021 गुरुवार रोजी भारतीय जनता पार्टी कडून राज्यव्यापी सर्व ओबीसी आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात होते
चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी कडून खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत चोपड्याचे तहसिलदार श्री.अनिल गावित यांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना मिळणारे आरक्षण मिळण्यासाठी, ओबीसी समाजाचे आरक्षण पुर्नस्थापित करण्यासाठी निवेदन देण्यात आले..
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे,उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेल अध्यक्ष श्री.प्रदिप पाटील,मा.सभापती आत्माराम म्हाळके,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,चोपडा पं.स.सभापती सौ.प्रतिभाताई पाटील,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष तुषार पाठक,चंद्रशेखर पाटील, जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे,सरचिटणीस हनुमंत महाजन,सुनिल सोनगिरे,मनोहर बडगुजर, चिटणीस भरत सोनगिरे, विठ्टल पाटील,सरचिटणीस अमोल पाटील,मिलिंद पाटील,डाॅ.विक्की सनेर,ओबीसी सेल शहराध्यक्ष सुरेश चौधरी,उपाध्यक्ष प्रविण चौधरी, सौ.अनिता नेवे,डाॅ.भारतीताई क्षिरसागर,राजेंद्र ढाबे,गोविंद सैंदाणे,निलेश महाजन,भुषण महाजन,विजय बाविस्कर,सुमित चौधरी,पंकज पाटील,रावसाहेब पाटील,चंद्रशेखर ठाकरे,हिंमतराव पाटील,भाईदास कोळी,दिनेश जाधव,मिलिंद वाणी,कार्यालय प्रमुख मोहित भावे,आदि पदाधिकार्यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.






