जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांच्या मार्फत शहरात विविध ठिकाणी सॅनिटायझेशन

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे मार्फत जळगावातील पोलीस स्टेशन्स कार्यालये , मुख्य कार्यालय ग. स .सोसायटी चे कोविड चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील जनमत प्रतिष्ठान व कुणाल संजय जडे यांच्याकडून विविध ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याचा उपक्रम सुरु आहे.
काल (दि.२७) जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे कडून राहुल भाऊ लोखंडे यांच्या जन्मदिनानिमित्त तालुका पोलीस स्टेशन मध्ये अरसैनिक अल्बम ३०गोळ्या वाटप व पूर्ण तालुका पोलीस स्टेशनचे सॅनिटायझेशन करण्यात आले, त्याप्रसंगी तालुका पोलिस स्टेशनचे सतीश दादा पाटील सर, राजेश पाटील सर, प्रीतम पाटील सर, भाजपा युवा उपमहानगराध्यक्ष राहुल भाऊ लोखंडे उपस्थित होते.
तसेच शहरातील लोकमत ,दिव्य मराठी,पुण्यनगरी कार्यालय तसेच तालुका पोलीस स्टेशन, पंचायत समिती पूर्णपणे सॅनिटायझेशन करण्यात आले ,मदत कार्य क्रीडाशिक्षक प्रवीण पाटील सर, भारती शिक्षक महिला अध्यक्ष शितल ताई जडे, हर्षाली पाटील जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व कुणाल जडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here