चेन्नई – चेन्नईतील एका सिंहिणीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. चेन्नईतील वंडालूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयातील 9 सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. प्राणिसंग्रहालयाकडून ही माहिती देण्यात आली.
प्राणिसंग्रहालयातील 9 वर्षांच्या निला नावाच्या सिंहिणीचा 3 जून रोजी संध्याकाळी कोरोनाने मृत्यू झाला. संग्रहालयातील 11 पैकी 9 सिंहांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिंहांच्या स्वॅबची तपासणी भोपाळमध्ये करण्यात आली होती.
भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद) येथे हे अहवाल पाठवण्यात आले आहेत. सध्या सर्व सिंहांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.






