जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जनमत प्रतिष्ठान, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व गगन झेप उर्जा फाउंडेशनकडून रविवार (दि. ६) भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील शाळा आरोग्य सेवा केंद्र पोलीस स्टेशन दवाखाना तसेच भुसावळ शहरातील तालुका पोलीस स्टेशन येथे पी आय रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायझेशन, वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी तेथील सरपंच, माजी सरपंच , राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी ,डी ,पाटिल सर,तसेच जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले ,प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील सर, सुरेंद्र सिंग पाटील सर, गगन झेप फाऊंडेशनचे गिरीश पवार , रघुनाथ सोनवणे आप्पा, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनाचे हर्षाली पाटील यांची उपस्थिती लाभली.









