वांद्रे येथे इमारतीची भिंत कोसळली; 1 ठार, 6 जखमी

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – वांदय़ामधील खेरवाडी येथे रविवारी मध्यरात्री इमारतीची भिंत चाळीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक ठार तर सहाजण जखमी झाले. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य सुरू करत 11 जणांची सुखरूप सुटका केली.

जखमींवर भाभा, व्ही. एन. देसाई आणि केईएम रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. वांद्रे येथील खेरवाडी रोड परिसरात असलेल्या एका चार मजली इमारतीची भिंत रविवारी मध्यरात्री 2 वाजता बाजूच्या दोन मजली रज्जाक चाळीवर कोसळली.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचून त्यांनी बचावकार्य सुरू केले. दलाचे जवान पोहोचण्याआधी स्थानिकांनी सहाजणांना ढिगाऱयाखालून बाहेर काढले, तर अग्निशमन दलाच्या जवानांनी 11 जणांची सुखरूप सुटका केली. जखमींना वांदय़ातील भाभा, विलेपार्ले येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय तर काही जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here