मदन कारंडे यांच्या पाठपुराव्याला लवकरच यश
कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये रिक्तपद भरती करणे या साठी संदर्भात राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कडे रिक्त पद भरती होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी दिनांक 1/6/2021 रोजी आपल्या पत्रद्यारे मागणी केली होती.
या मागणीला अनुसरून दिनांक 8/6/2021 रोजी आरोग्य राजमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुंबई मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकी मध्ये IGM रिक्त पदावरील विषयावर या बैठकित चर्चा करण्यात आली तरी IGM हॉस्पिटल 200 बेड मंजुरी हॉस्पिटल आहे त्यासाठी 220 कर्मचारी मंजुरी आहे. परंतु सध्या 107 कर्मचारी कार्यरत आहेत . 93 रिक्त कर्मचारी हे नवीन भरती करून दोन मिहिण्यामध्ये देण्याचे मान्य केले आहे व 42 कर्मचारी नियुक्ती बाबत निर्णय झाला असून लवकरच त्यांना नियुक्त करण्याबाबत आदेश दिले जातील असे हे ना.यड्रावकर म्हणाले.
या बैठकीस राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील, यड्रावकर आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे , आरोग्य सेवा संचालक श्रीमती साधना तायडे , वैद्यकीय शिक्षण संचालक तात्यासो लहाने, कोल्हापूर आरोग्य सेवा उपसंचालक अनिल माळी, बांधकाम सभापती उदय सिंग पाटील , अमित गाताडे आदी उपस्थित होते.






