बंद अवस्थेत असलेला अक्कलकोट नगरपरिषद दवाखाना पुन्हा सुरू करण्याची एम आय एम पक्षाची मागणी.

अक्कलकोट(तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – आज दिनांक-०८ जून २०२१ रोजी एम आय एम सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष जनाब हाजी फारुख भाई शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १४ वर्षापासून बंद अवस्थेत असलेला अक्कलकोट नगरपरिषद दवाखाना जो कोरोना महामारी च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर एक सक्षम असा सार्वजनिक आरोग्य केंद्र म्हणून पर्याय ठरू शकतो तो पुन्हा सुरु करावा अशी एमआयएमतर्फे मागणी करण्यात आली.

अक्कलकोट शहरातील गोरगरीब व रोजंदारी करून खाणाऱ्या लोकांना दैनंदिन जीवनाच्या आजारासाठी काळाची गरज असलेला अक्कलकोट नगरपरिषद दवाखाना हा त्वरित सुरू करावा आणि यासाठी स्वतंत्र असा नगरपालिका फंड तयार करून त्याची सुरुवात करावी अशी मागणी एम आय आम पक्षातर्फे जनाब हाजी फारुख भाई शाब्दी यांच्यातर्फे अक्कलकोट नगरपालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

akkalkote-nagarprishad

mim-akkalkoteजर १५ दिवसात विशेष सभा आयोजुन ठराव मंजूर नाही केलात तर पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. निवेदन देण्यासाठी त्यांच्यासोबत अक्कलकोट तालुका अध्यक्ष अतिक बागवान शहराध्यक्ष इरफान भाई दावण्णा, तालुका युवा अध्यक्ष सैपनभाई हगलदिवटे, शहर अध्यक्ष सैपन भाई शेख, तालुका कार्याध्यक्ष असीम बागवान, तालुका सचिव मोहसिन मोकाशी, शहर उपाध्यक्ष सद्दाम शेख, शहर सचिव अकिब बागवान, शहर कार्याध्यक्ष मोहम्मद शिकलगार, शहर युवा उपाध्यक्ष मोहसिन शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here