सफाळे (प्रतिनिधी) – पालघर तालुक्यातील मौजे सोनावे , दारशेत उंबरपाडा या विभागातून रात्रीच्या वेळी शासनाची रेती उत्खनन / वाहतुकीचे कोणतेही अधिकृत परवानगी नसताना, विना रॉयल्टी स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी, चोरीच्या उद्देशाने रेती उत्खनन व वाहतूक केली जात आहे. अशी खात्रीलायक, गोपनीय माहिती तहसिलदारांना प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक ७ जून २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ च्या दरम्यान धनाजी तोरस्कर प्रांत अधिकारी पालघर, सुनिल शिंदे, तहसिलदार पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली राजु पाटील मंडल अधिकार सफाळे, किरण जोगदंड, तलाठी सजा टेंभिखोडावे. रत्नदिप दळवी, तलाठी सजा सफाळे उंबरपाडा, मनोज कुडू कोतवाल. व सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कहाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शर्मा पोलीस हवालदार कैलास शेळके पोलीस नाईक ए व्ही खोत पोलीस नाईक सुभाष राठोड पोलीस काॅन्सटेबल राजेंद्र घुगे पोलीस शिपाई यांच्या पथकाने व महसुली विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करून, जे सी बी च्या सहाय्याने रेती साठवून ठेवण्यासाठी तयार केलेल्या कुंड्या समूळ नष्ट करून रेती साठा जमिनीवर पसरवून नष्ट केला.
या धडक कारवाई मुळे रेतीमाफियांच्या मनात जरब निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.अशी माहिती हिरालाल लोखंडे यांनी दिली आहे.






