ग्रामीण भागात कोरोना काळात डॉ.अनिल कदम यांनी जपला रुग्णसेवेचा वसा !

मुंबई (जिल्हा प्रतिनिधी संतोष कृष्णा जाधव) – कोरोनामुळे महाराष्ट्र त्रस्त आहे.प्रारंभी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गावातील बहुतांशी डॉक्टरांचे दवाखाने आणि इस्पितळे बंद होती.मात्र लांजा तालुक्यातील कोर्ले गावामध्ये गेल्या वर्षभरापासून डॉ.अनिल कदम यांनी रुग्णसेवेचा वसा जपून आपल्या पेशाशी ते प्रामाणिक राहिले आहेत.कोरोनाच्या काळात कोर्ले गावातील सर्वसामान्य जनतेला दिलासा व मायेचा हात मिळाला तो म्हणजे डॉ.अनिल कदम यांचा.

वर्ष उलटून गेले तरी त्यांच्याकडे कोरोना पासून ते इतर आजारासाठी रुग्ण आले तरी ते रुग्णाना आपुलकीने विचारपूस करून रुग्णसेवा देतात.प्राथमिक दर्जाचे कोरोना रुग्ण वर्षभरात त्यांनी अनेक हाताळले आहेत.योग्य सल्ला आणि उपचार यामुळे रुग्ण त्यांच्याकडे विश्वासाने येतात.कोरोना च्या काळामध्ये डॉ.अनिल कदम लोकांच्या विश्वासाला पात्र ठरले.डॉ.अनिल कदम हे दिवस-रात्र रुग्ण सेवेत असतात.कोर्ले गावातील कोर्ले तिठा येथे त्यांचा दवाखाना असून रुग्णांना ते दिवस-रात्र सेवा देत असतात.कोर्ले गावातीलच नाही तर तालुक्यांतील इतर गावातील लोक डॉ.अनिल कदम यांच्याकडे येतात.असे मनमिळावू व्यक्तिमत्व डॉ.अनिल कदम या गावातील व तालुक्यांतील जनते च्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.त्यांनी घेतलेला रुग्णसेवेचा वसा मोठ्या जिद्दीने जोपासत आहेत.तसेच कोरोणाच्या लसीला सुरुवात झाली तेव्हा

जिल्हा आणि ग्रामीण भागातील कोर्ले गावातील डॉ.कदम यांनी कोरोणाची पहिली लस घेऊन. गावातील जनतेस लसीचे महत्व आणि मास्क,सॅनिटायझर,सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची गरज आहे.तसेच कोरोनाचे नियम ग्रामस्थांना समजाऊ सांगितले.यामुळे त्यांचे गावात आणि तालुक्यांमध्ये कौतुक होत आहे.कोरोनाचे नियम ग्रामस्थांना समजाऊ सांगितले.यामुळे त्यांचे गावात आणि तालुक्यांमध्ये कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here