केदारनाथच्या सेटवर सारा-सुशांतने घेतलं ड्रग्स? नीतीश भारद्वाज यांची धक्कादायक प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्यावर ड्रग्स घेण्याचा आरोप करण्यात आला. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने एनसीबीला दिलेल्या जबाबात ही माहिती दिली. ‘केदारनाथ’ सिनेमाच्या शुटिंगवेळी अभिनेता सुशांत आणि अभिनेत्री सारा ड्रग्स घेत असतं. आता या चित्रपटात सुशांतसोबत काम केलेल्या नितीश भारद्वाज यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी झालेल्या चर्चेत नीतीश यांना प्रश्न विचारण्यात आला की,’केदारनाथच्या शुटिंगवेळी सुशांतला ड्रग्सची सवय लागली होती का?’ यावर नीतिश यांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. पूजा गौर मला टीव्ही इंडस्ट्रीतील बदलत्या स्वरूपाबद्दल सांगत होती. त्याचवेळी ड्रग्सवर चर्चा सुरू झाली. यानंतर साराने देखील या फिल्म इंडस्ट्रीमधील ड्रग्सच्या समस्येबद्दल मला सांगितलं, अशी माहिती नीतीश भारद्वाज यांनी दिली. मला खूप चांगल्या पद्धतीने आठवतंय मी साराला या सगळ्यापासून लांब राहण्यास सांगितलं. कारण साराचं उज्वल भविष्य आहे.

यानंतर साराने भारद्वाज यांना आपण कधी ड्रग्सला हात देखील लावला नसल्याचा आणि पुढेही कधीही असं न करण्याचा विश्वास दिला. नीतीश यांनी सांगितलं की, सुशांत स्मोक करत असे. तो वेगळ्या स्वभावाचा होता. जी व्यक्ती ड्रग्सचं सेवन करते ती अशी नसते. मी जेवढं त्याला ओळखतो तेवढा तो अतिशय समजुतदारपणे बोलत आहे. ‘मी स्मोक करत नाही. मी तंबाखू किंवा ड्रग्सचं सेवन करत नाही. मात्र ड्रग्सचं सेवन करणाऱ्या व्यक्तीचा वेगळा वास येतो. मी कधी सारा आणि सुशांत यांना नशेत ट्रिप करताना पाहिलं नाही. ते अतिशय नॉर्मल दिसत.’, असं देखील नीतीश यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here