माजी पंतप्रधान नरसिंह राव व यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू स्वीय सहायक राम खांडेकर यांचे निधन

नागपूर (प्रतिनिधी) – राम खांडेकर यांचे काल रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमई ते ८७ वर्षांचे होते. त्यांनी नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे ते विशेष अधिकारी होते. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मुकूल, सून संगीता, दोन नातवंडं असा परिवार आहे.

१९८५ साली नरसिंह राव यांनी त्यांचा रामटेक मतदारसंघाच्या नियोजनाची जबाबदारी खांडेकर यांच्याकडे सोपवली होती. १९९१ मध्ये जेव्हा नरसिंह राव पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांचे विशेष अधिकारी म्हणून खांडेकर यांची नियुक्ती झाली.

खांडेकर यांनी राव यांच्या निधनापर्यंत त्यांच्यासोबत काम केले. त्यांनी अनेक वर्तमानपत्र आणि मॅगझिन्समध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे लेखही लिहिले. अनेक दिवाळी अंकांसाठी त्यांनी त्यांच्या कामाबद्दल आणि अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटींसंदर्भातले ६० ते ७० लेख लिहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here