जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार, शिवसेना जिल्हा प्रमुख, महिला आघाडी जिल्हा संघटिका, जिल्हा युवाधिकारी, जिल्हा समन्वयक, उपजिल्हाप्रमुख,विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका प्रमुख, तालुका संघटक शहरप्रमुख प्रमुख, शहर संघटक, नगराध्यक्ष,नगरसेवक, जि.प.सदस्य यांची दि. 12 जुन रोज शनिवारी 11 वाजता हॉटेल रॉयल पॅलेस जळगांव येथे जिल्हा बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीला शिवसेना उत्तर महाराष्ट्र संम्पर्क नेते खा.संजय राऊत, उपनेते, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा संम्पर्क प्रमुख संजय सावंत, सह सम्पर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन विष्णू भंगाळे जिल्हा प्रमुख, ( ज. शहर, ज. ग्रामीण, अमळनेर विधानसभा ) व डॉ हर्षल माने जिल्हा प्रमुख, ( एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव विधानसभा) यांनी केले आहे.






