सोमपा परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक ‘ब’ रद्द करून सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रक ‘अ’ मध्ये समाविष्ट करा

tirupati-paripandala-solapur

सोलापूर महानगर पालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला यांची मागणी

सोलापूर(तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – आज (दि.१०) सोमपा परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक ब हे सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रक अ मध्ये समावेश करण्यात यावे या मागणीचे निवेदन मा. पी. शिवशंकर आयुक्त सोलापूर महानगर पालिका व मा. श्रीराम पवार परिवहन व्यवस्थापक तथा सहा. उपायुक्त सोलापूर महानगरपालिका यांना परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला व गणेश साळुंखे यांनी दिले.

या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की, सोलापूर महापालिका परिवहन उपक्रम मार्फत गेल्या अनेक वर्षापासून शहर व ग्रामीण भागात बस सेवा पुरवली जात आहे. परिवहन उपक्रम गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून तोट्यात चालत आहे. आज ला सोलापूर शहराची लोकसंख्या ही जवळपास बारा लाख इतकी असून परिवहन उपक्रमाला मार्फत बस सेवा पुरवणे हे अत्यंत महत्त्वाची बाब असतानाही उपक्रमा कडून नागरिकांना बससेवा सुरळीत पणे देता येणे शक्य होत नाही. परिवहन उपक्रमाचे उत्पन्न कमी व खर्च मात्र जास्त होत आहे. तसेच कामगारांचे वेतन, कोर्टातील देय रकमा, सेवानिवृत्त सेवकांचे देय रकमा, फंड, ग्रैच्युइटिची देय रक्कम थकीत राहिलेले आहेत. याकरीता दरवर्षी मनपाचे अंदाजपत्रकात परिवहन उपक्रमास आर्थिक सहाय्य पेन्शन, मेन्टेनन्स व इतर करिता रकमेची तरतूद करण्यात येते गेल्या अनेक वर्षापासून उपक्रमा कडील सेवकांचे वेतन अदा करणे कामी ऍडव्हान्स स्वरूपात रक्कम अदा केली जात आहे परंतु अंदाजपत्रक मात्र वेगळे करण्यात येते.

tirupati-paripandala-nivedan

भविष्यात बसच्या संख्येत वाढ होईल अथवा नाही याची शाश्वती देता येत नाही तसेच या संख्येत वाढ झाल्यास सतत उत्पन्न वाढ होणार आहे उत्पन्न मिळाल्यास वेतन वेळेवर देणे शक्‍य होणार आहे. याकरिता परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक ब सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रक अ मध्ये समाविष्ट केल्यास सोलापूर महापालिकेला परिवहन उपक्रमास थेट अनुदान देणे शक्‍य होणार आहे. महापालिकेतील सेवकांप्रमाणेच परिवहन उपक्रमाकडील सेवकांचे देखील वेतन वेळेवर होण्यास मदत होणार आहे. आणि बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासी सेवा ही अत्यंत व्यवस्थितपणे देता येईल. तसेच परिवहन उपक्रमाकडील सेवकांना सोलापूर महापालिकेत वर्ग केल्यास परिवहन उपक्रमावर पडणारा वेतनाचा बोजाही कमी होण्यास मदत होणार आहे.

तरी वरील सर्व बाबींचा विचार करून आपणास विनंती करण्यात येत आहे की सोमपा परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक ब हे रद्द करून सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रक अ मध्ये समाविष्ट करण्यात यावे. मुंबईतील बेस्ट परिवहन उपक्रमाचे अंदापत्रक मुंबई महापालिकेच्या अंदापत्रकामध्ये समावेश करा म्हणुन शासनाकडे मुंबई महापालिकेने प्रस्ताव पाठविले आहे तो प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here