अलिबाग तालुक्यातील मांडवखार गावातील ९५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात 

95-year-old-man-defeat-corona

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – अलिबाग तालुक्यातील मांडवखार गावातील  नथुराम महादेव मोकल या ९५वर्षीय आजोबांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे.

खारेपाठ विभागातील मांडवखार येथील प्रसिद्ध बागायतदार व कुशल शेतकरी नथुराम महादेव मोकल (वय९५) यांना ताप खोकला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्या मुळे त्यांना २३/५/२१रोजी अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता त्याची तेथे कोरोना टेस्ट करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली होती .त्या मुळे त्यांना खूप त्रास ही होऊ लागला होता परंतु प्रचंड इच्छा शक्ती व अलिबाग सरकारी रुग्णालयातील डॉक्टर ,नर्स व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानी नथुराम मोकल आजोबानी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

बरे झाल्यावर त्यांनी कोरोनाला न घाबरता वेळेवर उपचार घेतल्यावर व डॉक्टरानी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यावर कोरोनाला हारवू शकतो तसेच सर्व कर्मचारी व मुलगा आनंद मोकल,धनंजय मोकल यांच्या प्रयत्ना मुळेच मी कोरोनावर मात केली असल्याचे त्यांनी सांगितले . सरकारी रुग्णालयातील नर्स व कर्मचारी यांनी त्यांना आनंदाने निरोप दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here