मलाला युसुफजाईला धमकावल्याप्रकरणी मौलवीला अटक

malala-yusuphajai

पेशावर (पाकिस्तान) – नोबेल पुरस्कार विजेती कार्यकर्ती मलाला युसुफजाई हिला धमकावल्याप्रकरणी एका मौलवीला अटक करण्यात आली आहे. विवाहाबद्दल मलालाने अलिकडेच व्यक्त केलेल्या मतांवरून मलालावर हल्ला करण्यासाठी त्याने लोकांना चिथावणीही दिली होती.

सुफ्ती सरदार अली हक्कानी असे या मौलवीचे नाव आहे. खैबर पख्तुन्वा प्रंतातील मेरवात जिल्हयातील तो मौलवी आहे. त्याच्या घरावर छापा घालून पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती लक्की मरवात जिल्बयाच्या पोलिसांनी दिली. त्याच्याविरोधात एसएचओ वसीम सज्जाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत ‘एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये मुफ्ती सरदार हा पेशावरमधील एकत्रीकरणामध्ये लोकांना कायदा हातात घ्यावा आणि मलालावर हल्ला करायला उद्युक्त करत असल्याचे दिसत आहे. ही चिथावणी देत असताना त्याच्या हातात शस्त्रही दिसत होते. ‘मलाला जेंव्हा पाकिस्तानात परत येईल, तेंव्हा तिच्यावर आत्मघातकी हल्ला करणारा मी पहिला असेल.’ असे तो म्हणाला होता.

वोग मॅगझीनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपण विवाह करणार की नाही हे निश्‍चित नसल्याचे मलाला म्हणाली होती. लोकांना लग्न का करावेसे वाटते, हेच आपल्याला समजत नाही. आवश्‍यकता भासल्यास कायदेशीर करार केला जावा, असे मलाला म्हणाली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here