कांदिवली पूर्वेकडील माजी नगरसेवक योगेश भोईर यांनी नाल्यात उतरुन स्वतः काढला कचरा; व्हिडीओ व्हायरल

former-mumbai-corporator-cleans-garbage-gutter

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पाण्याचा निचरा काढण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभागात फिरताना दिसून येत होते. कांदिवली पूर्वेकडील माजी नगरसेवक योगेश भोईर यांना प्रभागातील जानूपाडा येथील नाल्यात कचरा अडकल्याचे दिसून आले. तेंव्हा पालिका अधिकाऱ्यांची वाट न बघता योगेश भोईर यांनी स्वतःचक्क नाल्यात उतरून कचरा काढला.

मागाठाणे विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. २५ मध्ये विभागातील नागरिकांना याचा त्रास होऊ नये याकरता समय सुचकता दाखवत शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका माधुरी भोईर यांनी देखिल मुसळधार पावसातही कर्तव्य बजावले.

ज्या चाळीत पाणी साचण्याची शक्यता होती त्या ठिकाणी स्वतः जाऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी समवेत पाण्याचे निचरण केले व नालेसफाई केली. भोईर दाम्पत्यांच्या या धाडसी वृत्तीचे येथील नागरिकांनी कौतुक केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here