पांगरी नवघरे येथे पहिल्या श्रावण सोमवारी सार्वजनिक मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर

वाशिम (मालेगाव) (पंढरी गायकवाड) – पांगरी नवघरे येथील सर्व युवकांनी सामूहिक एक धरून कुठल्याही पक्षाच्या व तसेच राजकीय सामाजिक संघटनेच्या वतीने नसून स्वयंस्फूर्तीने पांगरी नवघरे येथील तसेच मसला येथील युवा वर्गाच्या वतीने स्वयंस्फूर्तीने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते
सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरणा सारख्या महाभयंकर बिमारी च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा फार तुटवडा पडत असून अनेक गरजूं व्यक्तींना वेळेवर रक्त पेटी उपलब्ध नसल्यामुळे जीव गमवावा लागत असते अशा पद्धतीची व परिस्थितीचे भान ठेवून डॉक्टर बी पी ठाकरे मेमोरियल ब्लड बँक अकोला यांना देण्यात आले गावातील युवावर्गाच्या वतीने सामूहिक रक्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये मालेगाव येथील युवक अकोला येथील युवक व गावातील संतोष त्र्यंबक नवघरे दत्ता शिंदे गजानन नवघरे भोला नवघरे राम नवघरे सुनील जोगदंड अमोल नवघरे पंढरी नवघरे आदी युवकांनी रक्तदान करून शिबिर पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here