दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागात ३ घरे कोसळली, एकाचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे काल (९ जून) दुर्घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी (१० जून) दहिसरमध्येही एक दुर्घटना घडली आहे. दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागात घरे कोसळल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येत आहेत.

दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागातील ३ घरे कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, माहितीनुसार अग्निशमन दल, मुंबई महापालिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सद्यस्थितीत एक जणाचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली असून, शहरातील या वाढत्या दुर्घटना निश्चितच प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here