भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ यांना ताप आला होता, त्यानंतर ते बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
फेब्रुवारी महिन्यात, माजी मुख्यमंत्री कमलनाथ मध्य प्रदेशातील इंदूर येथील खासगी रुग्णालयात लिफ्ट पडण्याच्या अपघातातून बचावले होते. त्यावेळी अपघाताच्या परिणामामुळे घाबरून गेल्यामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर रुग्णालयातच त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला होता. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्या प्रकृतीबाबत फोन करून चौकशी केली होती.






