चांदुर बाजार पोलिस स्टेशन येथे कोरोना योध्दा पोलिस पाटील यांचा सत्कार

अमरावती (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – चांदुर बाजार पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्व कोरोना योध्दा पोलिस पाटील यांचा पोलिस निरीक्षक सुनील किनगे यांनी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.

ग्रामस्तरावर पोलिस व जनता यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील कर्तव्यदक्षपणे कामकाज करीत असतात. सन 2020-21 मध्ये कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्तरावर जिवाची पर्वा न करता अहोरात्र परिश्रम घेऊन पोलिस पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे व सद्याही पार पाडत आहेत. अशा आपत्तीच्या काळात सामाजिक सलोखा अबाधित ठेवून पोलिस प्रशासनास सहकार्य केले आहे, अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे, जबाबदारीने पोलिस पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे, अशा या गौरवास्पद कामगिरी बाबत ग्रामीण भागात पोलिस पाटील यांचे अभिनंदन आणि प्रशंसा होत आहे.

chandurbazar-police-station

पोलिस पाटील कायम अशीच उल्लेखनीय कामगिरी करून पोलिस प्रशासनाला मोलाचे सहकार्य करतील या अपेक्षेने पोलिस पाटील यांचा सत्कार होणे उचित आहे, याच हिताच्या दृष्टीने पोलिस निरीक्षक सुनिल किनगे यांनी पोलिस पाटील यांचा सत्कार केला. यावेळी अमरावती जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल उके पाटील, पोलिस अंमलदार विरेंद्र अमृतकर आणि चांदुर बाजार पोलिस स्टेशन चे सर्व पोलीस पाटील हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here