नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – सध्या कोविड महामारीवर जालिम इलाज म्हणून रुग्णांना ऑक्सिजन लावला जातो. मात्र नैसर्गिक ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वृक्षांची कत्तल होत असते. जीवसृष्टीला २४ तास ऑक्सिजन पुरवठा करणारे म्हणून पिंपळ वृक्ष ओळखला जातो त्याकरिता पिंपळ वृक्षांची लागवड धाराशिव संचलित वसंतदादा सहकारी साखर कारखाना परिसरात करण्यात आली.
या वृक्ष लागवडप्रसंगी कोविड योध्दा कुबेर जाधव, सुरक्षा अघिकारी किरण अहिरे, समाधान गायकवाड, बाळासाहेब पवार आदी निसर्गप्रेमी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते कुबेर जाधव यांनी येत्या पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तीने पाच तरी वृक्षांची लागवड करावी व वर्षभर त्याला पाणीपुरवठा करुन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले.






