मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये स्तुत्य उपक्रम..

कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी तालुका उपाध्यक्ष महेंद्र दादा निगुडकर आणि कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक धनंजय दुर्गे यांच्या माध्यमातून तसेच रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कर्जत वीज कंपनीचे वायरमन आपल्या जीवाची पर्वा न करता विजेचे काम करून आपली सेवा बजावतात या योध्यांना पावसाळी रेनकोट वाटपाचा कार्यक्रम तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पक्षाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यात आले.

कर्जतमध्ये कोरोना संसर्ग काळ असूनही आजपर्यंत अहोरात्र आपल्या जीवाची – कुटुंबाची पर्वा न करता वीज कंपनीचे वायरमन आपले कर्तव्य बजावत असताना दिसत आहेत. त्यातच नैसर्गिक संकट येऊन जे चक्रीवादळ झाले त्यावेळी देखील कर्जत शहरातील सात ते आठ तर तालुक्यात जवळजवळ ३७ विजेचे खांब पडले असताना दिवसरात्र मेहनत करून वीज पुरावठा पूर्ववत करून कर्जतकरांना उजेडात ठेवले.

karjat2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here