प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व सोने व्यापारी भागवत भंगाळे यांनी भरले होते बीएचआरचे कर्ज

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – बीएचआर प्रकरणाच्या चौकशीला वेग आला असून अनेकांभोवती फास आवळला गेला आहे. आज (दि.१७) सकाळी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जळगावातील मान्यवरांना अटक केल्यानंतर शहरात खळबळ माजली होती.

 

अटक झालेल्यांमध्ये भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर) यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर) या मान्यवर व्यक्तींचा समावेश होता.

 

दरम्यान जळगावातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व सोने व्यापारी भागवत गणपत भंगाळे यांनी बीएचआरमधून ४ एप्रिल २००७ रोजी २५ लाख मुदत कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड त्यांनी २२ मे २०१८ रोजी केली असून त्याचा निरंक दाखला देखील घेतला आहे. भंगाळे यांनी कर्जपोटी तारण ठेवलेली मेहरूण शिवारातील मालमत्ता रिलीज केल्याचे पत्र २२ मे २०१८ रोजी त्यांना दिले असल्याची माहिती सागर भंगाळे यांनी सांगितले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here