लहान मुलांच्या खेळणीविक्रीआड चरस विकणाऱ्या आरोपीस मुंबई पोलिसांची अटक

मुंबई (विशेष प्रतिनिधी संजय शेकोकार) – शहरात अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक व सेवन करणाऱ्या इसमांचा शोध घेवून अशा इसमांचे विरुध्द कारवाई करण्याचे निर्देश मा. वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार कक्ष-१०, गुप्रशा, मुंबई येथील पोलीस पथक अंमली पदार्थ बाळगणाऱ्या, वाहतुक व विक्री करणाऱ्या इसमांच्या सातत्याने शोधात होते. दिनांक १६/०६/२०२१ रोजी प्रभारी पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार सपोनि. वाहीद पठाण यांच्या अधिपत्याखाली पथकाची अंमली पदार्थ संबंधी कारवाईकरीता नियुक्ती करण्यात आली होती.

दिनांक १६/०६/२०२१ रोजी कक्ष-१० गु.प्र.शा. येथील पथक देवनार पोलीस ठाणेच्या हद्दीतील जनता टिंबर मार्केट जवळ, गोवंडी, मुंबई या परीसरात अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असतांना सुमारे २३.०० वा. एक इसम उभा असून तो आजूबाजूला सारखे पहात असतांना सपोनि. वाहीद पठाण यांना दिसून आला. त्याच्या हालचालींवर पोलीस पथकाने बारकाईने लक्ष ठेवले असता तो कोणाच्यातरी येण्याची वाट पहात असल्याचे दिसून आले. पोलीस पथकाचा संशय बळावल्याने त्यास घेराव घालून अटकाव केला असता त्याच्याकडे एक निळया रंगाची प्लॅस्टिकची लहान कॅरीबॅग दिसून | आली व तो ती बॅग लपविण्याचा प्रयत्न करू लागला. सपोनि. वाहीद पठाण यांनी त्यास पिशवीत काय आहे याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवून लागला. जागीच दोन पंचांना पाचारण करून सदर सदर इसमाची व त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्याच्याकडे खालील नमूद वर्णनाचा चरस हा अंमली पदार्थ आणि अन्य मुद्देमाल मिळून आला. हस्तगत केलेला अंमली व अन्य मुद्देमाल पदार्थ :एकूण ७५० ग्रॅम वजनाचा ‘चरस’ हा अंमली पदार्थ एकूण किंमत रू. २२,५०,000/-, रोख रू. ६००/-, आधारकार्ड | आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन. ताब्यात घेतलेला इसम :एक पुरूष, वय ३४ वर्षे, राहणार-धारावी, मुंबई.

याबाबत समोर आलेल्या परिस्थितीचा रितसर पंचनामा करून नमूद इसमास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील अंमली पदार्थ आणि मुद्देमाल, एन.डी.पी.एस. कायद्यातील तरतुदींना अनुसरून सिलबंद करून ताब्यात घेतला. जप्त अंमली पदार्थासह नमूद इसमास पुढील कायदेशिर प्रक्रियेकरीता देवनार पोलीस ठाणे येथे नेण्यात आले. अटक आरोपीने अन्य एका इसमाने त्यास विक्रीसाठी दिलेला अंमली पदार्थ बेकायदेशिरपणे जवळ बाळगून त्याची वाहतुक केली म्हणून पोशिक. ०४१३१४/मनोज नार्वेकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १७/०६/२०२१ रोजी देवनार पोलीस ठाणे येथे वि.स्था.गु.नों.क्र. ५२/२०२१, कलम ८(क), २०, २९ एन.डी.पी.एस.अॅक्ट, १९८५ अन्वये गुन्हा नोंद केला. आरोपी व जप्त मददेमाल देवनार पोलीस ठाणेच्या ताब्यात देऊन आरोपीस अटक केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास देवनार पोलीस ठाणे येथे चालू आहे. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता तो लहान मुलांची खेळणी विक्री करण्याचा फेरीचा व्यवसाय करीत असतो परंतु त्यातून मिळणारे उत्पन्न कमी पडत असल्याने अधिक आर्थिक फायद्यासाठी तो अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याचे चौकशीत निदर्शनास आले.

सदरची यशस्वी कारवाई सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस्.विरेश प्रभू, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिध्दार्थ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-१० गुन्हे शाखा येथील प्र.पो.नि. महेशकुमार ठाकूर, यांचे पर्यवेक्षणाखाली स. पो.नि. वाहीद पठण, धनराज चौधरी, अफरोज शेख, पोलीस अंमलदार जगदीश धारगळकर, अजित पाटील, अविनाश चिकणे, मनोज नार्वेकर या पथकाने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here