मुंबईत शिक्षकांना रेल्वे प्रवासासाठी राज्य सरकारचा हिरवा कंदील

mumbai-local

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – दहावीचे अंतिम निकाल लावताना अंतर्गत मूल्यमापनासाठी शिक्षकांना गेल्या सोमवापासून शाळांमध्ये उपस्थित राहण्याचा सुचना दिल्या. मात्र रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने शिक्षण आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान नाह त्रास सहन करावा लागत होता. याचपार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शिक्षकांच्या रेल्वे प्रवासाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षण आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. दहावीच्या मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांना लोकक प्रवासाची परवानगी द्यावी असा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होते. या प्रस्तावास आज राज्याचे मुख्यमंत्री द्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता.

मुंबईच्या भौगोलिक परीस्थितीचा विचार करता बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा, व नवी मुंबई आणि पनवेल अशा ठिकाणी राहतात. या मध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. या निर्णयामुळे दहावी मूल्यमापनाच्या प्रक्रियेत संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षकांना उपनगरीय रेल्वेमध्ये लेवल २ किंवा त्यापेक्षा खालील पास देण्यात येतील. हे रेल्वे पास ऑनलाईन एसएमएस डाउनलोडच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. यासाठीची लिंक देण्यात येईल. यासर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई हे काम पाहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here