छावा संघटनेचे पदाधिकारी विलास पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

जामनेर (प्रतिनिधी) – शेंदूर्णी येथील अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे संपर्कप्रमुख विलास पाटील यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला.
डॉ.मनोहर पाटील, पाळधी व कुऱ्हाड गटाचे जि.प.सदस्य दिपक राजपूत, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वजित राजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश झाला. यावेळी सांडूमामा गुरव, ॲड.भरत पवार, पवन माळी, अरुण पाटील, निळकंठ पाटील, विशाल पाटील, काशिनाथ शिंदे, सचिन पारधी, मुकेश जाधव, सर्व पदाधिकारी व शिवसैनिक तसेच छावाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here