आता पुण्यात २३९४ कोरोनाबाधित; ५५ जणांचा मृत्यू

पुणे (अमोल सोळंके) – पुण्यात मंगळवारी दिवसभरात 2 हजार 394 नवे रुग्ण आढळले आहेत. यात पुणे शहरातील 1 हजार 213, तर पिंपरी चिंचवडच्या 1 हजार 181 रुग्णांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरात 35 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 13 जणांसह जिल्ह्यात एकूण 55 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
पुणे शहरात मंगळवारी 6 हजार 567 संशयितांचे नमुने आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचणीसाठी घेण्यात आले. याआधी घेतलेल्या नमुन्यांपैकी 1,213 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 50 हजार 430 झाली आहे. दिवसभरात 591 बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 30 हजार 80 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या शहरात 19 हजार 135 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सूरू आहेत. त्यापैकी 742 गंभीर असून, 98 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
उपचारादरम्यान मंगळवारी पुणे शहरात 35 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 23 पुरुष, तर 10 महिला आहेत. या मृतांचे वय 33 ते 87 च्या दरम्यान होते. हे रुग्ण पर्वती दर्शन, सुखसागरनगर, पद्मवाती, भवानी पेठ, धायरी, एरंडवणेमधील दोन, कोथरूडमधील तीन, धनकवडीमधील दोन, हडपसर, सोमवार पेठ, कोंढवा बुद्रुकमधील दोन, औंध, शिवदर्शन, सिंहगड रोडमधील दोन, येरवड्यामधील दोन, डेक्‍कन, मार्केट यार्ड, शुक्रवार पेठ, घोरपडी, इंदिरानगर, कात्रज, दत्तवाडी, आनंदनगर येथील रहिवासी होते. त्यापैकी काहींना जोखमीचे आजार होते. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 215 वर पोचली आहे.
पिंपरी-चिंवड शहरात कोरोनाचे एकूण 1,181 नवे रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 701 झाली आहे. तर, 3 हजार 550 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 432 रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 962 झाली आहे.
सांगवीतील पुरुष (68), कासारवाडीतील पुरुष (58), मोशीतील महिला (65), चिंचवडमधील पुरुष (73) व महिला (95), काळेवाडीतील पुरुष (72), भोसरीतील पुरुष (34) व महिला (80), रूपीनगरातील पुरुष (51), ताथवडेतील महिला (58), वाकडमधील पुरुष (73), देहूरोडमधील महिला (75), फुरसुंगीमधील पुरुष (71) या 13 जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 382 जणांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here