खासगाव येथील स्मशानभुमी व गावठाणच्या जागेत बोगस नोंदी लाऊन अतिक्रमण; कारवाई करण्याची मागणी

१० दिवसात कारवाई नाही झाल्यास तहसिल कार्यालया समोर अंदोलन ग्रामस्थांचा इशारा

धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – तालुक्यातील खासगाव येथील स्मशानभुमी व गावठाणच्या जागेत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करून बोगस नोंदी लाऊन महादेव लिमकर, व नितीन लिमकर यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा तहसिल कार्यालयासमोर अंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे .

दि १७ जुन रोजी तहसिलदार परंडा व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खासगाव येथील स्मशानभुमी व गावठाणच्या जागेत नितीन लिमकर, व महादेव लिमकर यांच्या नावाची ग्रामपंचायतमध्ये १० गुंठे जागेवर बोगस नोंद लावण्यात आली आहे . या अतिक्रमणामुळे स्मशानभुमीसाठी अडचण निर्माण झाली आहे

dharasiv-news

या बेकायदेशीर नोंदीची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी व अतिक्रमण काढण्यात यावे १० दिवसात कारवाई नाही झाल्यास तहसिल कार्यालया समोर अंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे . या निवेदनावर श्रीमती मंदा पाटील , हनुमंत जगदाळे , अरूण सातपुते , अभिषेक रमेश लिम कर, बबन दत्तू लिमकर, भारत थाटे , पोपट , लिमकर , सुधिर लिमकर, भागवत लिमकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here