कर्जत उपजिल्हा रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटअर भेट

कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) – कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नवी मुंबई येथील अग्रवाल दांपत्याने आज ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटअर भेट दिली.

याप्रसंगी कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज बनसोडे, अशोक ओसवाल, सरिता अग्रवाल, संदीप भोईर, संतोष निलधे, सुनील घरत आदी उपस्थित होते नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी अग्रवाल दांपत्याने केलेल्या कार्याची स्तुती करून नगरपरिषदेच्या वतीने आभार मानले

कोरोना महामारीच्या परिस्थिती ऑक्सिजनअभावी अनेकांने आपले प्राण गमवावे लागले आहे अनेकांकडे पैसा असून देखील वेळेत उपचार मिळत नाही त्यामुळे जीवनापेक्षा पैसा महत्वाचा नाही.अशी अवस्था झाली आपण नोकरी करून समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे मी कमावलेल्या पैशातून काही हिस्सा गरीब व गरजूंना मदतीचा हातभार लावत आहे.त्यामुळे समाजाची सेवा करण्यासाठी माझे अग्रवाल कुटुंब नेहमीच सक्रिय सहभाग असतो.त्यामुळे ही सेवा करताना आनंद होत असल्याचे समाजसेवक पुरूषोत्तम अग्रवाल यांनी बुलंद पोलीस टाइम्सशी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here