सातारा जिल्हा उद्यापासून अनलॉक, वाचा जिल्ह्यात काय सुरु, काय बंद?

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्गाचा आलेख आता उतरता झालेला पाहायला मिळतोय. ब्रेक द चेनच्या नवीन नियमांची घोषणा करून तीन आठवडे झाले आहेत. या तीनही आठवड्यात हा आलेख उतरता पाहायला मिळतोय. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक पाहायला मिळत होती. त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. या सहाही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन उद्यापासून शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आकडेवारी कमी झाल्यामुळे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून, सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर हॉटेल 50 टक्केच्या क्षमतेने 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

हे असेल सुरु
सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश
हॉटेल पन्नास टक्केच्या क्षमतेने 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी तर
रात्री 8 पर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी
शेती व शेतीविषयक आस्थापने पूर्ण सुरू
बैठका, संस्था सभांना 50 टक्के क्षमतेने मान्यता
व्यायाम शाळांना, जिमला 50 टक्के क्षमतेने मान्यता
चित्रीकरणला परवानगी पण बायोबबलमध्येच
क्रीडांगणे, खेळ सूरु पण स्पर्धा नाहीत
धार्मिक स्थळे बंद, कार्यक्रमावर मर्यादाच
क्रीडांगणे, खेळ सूरु पण स्पर्धा नाहीत
धार्मिक स्थळे बंद, कार्यक्रमावर मर्यादाच
बसेस पूर्ण क्षमतेने सुरू राहणार
मास्क न घालणाऱ्या दुकानदारांवर दुकान सिलचे आदेश
मास्क न घालता फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड
लग्नाला अवघ्या 25 लोकांनाच परवानगी तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here