कुंभोज कोविड सेंटरला आ.राजीव आवळे यांची भेट

कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – कुंभोज गावांत कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कुंभोज ग्रामपंचायतने रयत शिक्षण संस्था येथे कोविड सेंटर उभारले आहे व बाहुबली येथे अलगिकरण सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.राजीव आवळे यांनी कोविड सेंटर व अलगिकरण सेंटरला भेट देऊन पेशंटच्या तब्येतीची विचारपूस केली व काळजी घेण्याचे आवाहन केले व कोविड योद्धे यांचा सत्कार ही आ.आवळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास कुभोजचे सरपंच माधुरी गोदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी.बी.पिष्टे, युवा नेते किरण माळी, ग्रामसेवक कठारे, सुभाष देवमोरे यांनी मनोगत व्यक्त केले…

rajeev-awale-mask-distribution

corona-yodhya-sanman-at-kumbhoj आभार मा.पं. स. संतोष माळी यांनी मानले.. शरद संचालक अप्पासाहेब चौगुले, रावसाहेब चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश भोसले, धनाजी पाटील, सागर सुवासे, ललित नवनाळे, सागर भोरे, संदिप तोरस्कर, सदानंद महापुरे, रघु इलगार, रईस मुजावर आदी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here