मुक लघुचित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांनी सांगितले ‘योग’चे महत्व

ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष जैन) – ‘२१ जून’ हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय अर्थात ‘जागतिक योगदिन’ म्हणून साजरा केला जातो. सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असा हा दिवस आहे. योग शास्त्राची निर्मिती पाच हजार वर्षांपूर्वी पतंजली या महर्षीनी भारतात केली. आजच्या धकाधकीच्या जीवनात म्हणा किंवा कोरोना संक्रमाणाच्या काळातही आपल्या आरोग्यासाठी घर बसल्या व अत्यंल्प खर्चात करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘योग’.

संकल्प इंग्लिश स्कूल – ठाणे ही ठाण्यातील शाळा गेली अनेक वर्ष ‘योग’ या विषयासाठी अविरत प्रयत्न करीत आहे. माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शालेय वेळापत्रकात ‘योग’ ची तासिका ठेवून योगाभ्यास अनिवार्य केला आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना घरी योगा करण्याविषयी प्रयत्न केले जात आहेत. या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व संस्थाचालकांनी मिळून २०२० मध्ये ‘योग’ विषयावर आधारित लघुपट यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करायचे ठरवले होते. त्यातूनच अविष्कार झाला तो ‘मोटू बना पतलू’ या शॉर्टफिल्मचे विशेष म्हणजे ही शॉर्टफिल्म मुक लघुचित्रपट आहे व चित्रपटमहामंडळात ही कथा रजिस्टर आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. ज्योती परब यांनी ही कथा लिहिली आहे. शरीराचे वाढते वजन प्रत्येकासाठी अत्यंत धोकादायक असते. असे शरीर अनेक आजाराचे माहेरघर बनते. शिवाय अशी व्यक्ती समाजाच्या चेष्टेचा विषय बनू शकते.

sankalp-english-school-thane

आजच्या जीवनशैलीने लहानपणापासून लठ्ठपणाचा विकार आपणास ग्रासू शकतो. परंतु डॉक्टरांचा योग्य सल्ला, पूरक आहार, खेळ व योगाच्या साहाय्याने लठ्ठपणा घालवू शकतो. असे सांगणारी ही कथा आहे. शिवाय या कथेचे दिग्दर्शन याच शाळेची माजी विद्यार्थीनी कु. साक्षी हिने केले असून इयत्ता ८ वीचा विद्यार्थी कु. साईराज याने शूटिंग, एडिटिंग या बाजू सांभाळल्या आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प खर्चात तयार केलेली व जगाला संदेश देणारी अशी शॉर्टफिल्म तयार केली आहे. या शॉर्टफिल्मसाठी समाजातील अनेक लोकांनी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे शॉर्टफिल्म अत्यल्प खर्चात झाली असे या फिल्मचे प्रोड्युसर व शाळेचे संस्थाचालक डॉ. राज परब सर यांनी सांगितले.

मोटू बन गया पतलू या लघुपटाच्या मुहूर्ताचा शॉट संकल्प इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात शूट करून याचे उद्घाटन करण्यात आले. आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था अध्यक्ष हेमंत नेहते यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. या प्रसंगी सांस्कृतिक कालदर्पण या कवितांच्या दिनदर्शिकेचे संपादक जयंत भावे , महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गोसावी आणि अक्षरआनंद न्यूज पोर्टलचे कार्यकारी संपादक डॉ योगेश जोशी उपस्थित होते.

या शॉर्टफिल्ममध्ये प्रमुख भूमिकेत या शाळेचा इयत्ता ७ वीचा विद्यार्थी कु. ऋषभ कुडासकर व कु. ओम राठोड असून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व मुख्याध्यापकानीही आपली भूमिका बजावली आहेत. सर्वांनी पाहावी अशी ही शॉर्टफिल्म योगदिनाच्या दिवशी प्रसारित होणार असून ‘See India’ या यूट्यूब च्या चॅनेलवर ही शॉर्टफिल्म सर्वजण पाहू शकणार आहेत. सर्वांनी जरूर पहा ‘मोटू बना पतलू’ व हा मुक लघुपट जगभर पाठवून योगाचे महत्व सर्वांना पटवून द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here