कर्नाळा बँकेच्या ठेविदारांची रविवारी बैठक

पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजन

पनवेल-सोगावकर – डबघाईस गेलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेविदारांची बैठक पनवेल संघर्ष समितीने येत्या रविवारी (ता.20) सकाळी 11 वाजता पनवेल-ठाणा नाका येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. ठेवीदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांचा परामर्श घेताना पुढील सामाजिक रणनिती ठरविण्यासंदर्भात कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेविदारांनी गेल्याच आठवड्यात कडू यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेवून बैठकीचे आयोजन करण्याची सुचना केली होती. त्यानुसार खारघर, उलवे नोड, पनवेल, नवीन पनवेल येथे बैठका घेण्याचे ठरले होते.

परंतु, पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात बैठक आयोजित करण्यात येत असल्याने विभागस्तरावर होणार्‍या बैठका रद्द करून येत्या रविवारी (ता. 20) सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृहात कोरोनाचे नियम पाळून, मास्क लावून बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन ठेविदारांचे प्रतिनिधी मिथून भोईर, टी. नम्रता, डॉ. गायकवाड, समिर भगत, पद्माकर पाटील, प्रतिमा मुरबाडकर, रत्ना बडगुजर, रवी म्हात्रे आणि ठेविदार सहकार्‍यांनी केले आहे.

या बैठकीत सामाजिक स्तरावर महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याने खारघरपासून महाडपर्यंत आणि पनवेलपासून उरण, खोपोली, रसायनी, उलवे नोडमधील ठेविदारांनी उपस्थित राहवे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here