शिंदखेडा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचा 55 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

शिंदखेडा (प्रतिनिधी) – शिवसेना हा विचारांवर चालणारा पक्ष असून शिवसेनेची शाखा न्यायमंदिरे आहेत. जेव्हा सर्वसामान्य, गोरगरीबांना कुठेही न्याय मिळत नाही तेव्हा शिवसेनेच्या शाखेत न्याय मिळतो, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी येथे केले. शिवसेना पक्षाचा 55 व्या वर्धापन दिन शिंदखेडा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलतांना श्री.साळुंके म्हणाले की, स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा काळ हा जाज्वल्याचा होता. देशात राजकीय पक्ष अनेक असून बाळासाहेबांनी केलेली शिवेसना पक्षाची जडणघडण आजही कायम आहे. पक्षाची अशी बांधणी कुठल्याही पक्षात नाही. त्यातच पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांचे सुसंस्कत असे नेतृत्व आहे. साहेबांच्या कार्यपध्दतीमुळे संपूर्ण देशात उध्दवसाहेबांचे नांव आदराने घेतले जाते. खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सोडवण्याची हीच वेळ असून जनभावना कळल्यास लोकांचे प्रश्न समजण्यास मदत होते असेही श्री.साळुंके म्हणाले. शिवसेनेच्या वाटचालीची माहिती देऊन विनायक पवार, डॉ.मनोज पाटील, शानाभाऊ सोनवणे, विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील, मंगेश पवार आदींनी जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

shindkheda-shivsenashinkheda-shivsena-newsयाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, दोंडाईचा उपजिल्हा संघटक कल्याण बागल, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्जेराव पाटील, विधानसभा संघटक गणेश परदेशी, तालुका प्रमुख गिरीश देसले, दोंडाईचा तालुका प्रमुख ईश्वर पाटील, तालुका संघटक डाँ.मनोज पाटील, शहर प्रमुख संतोष देसले, तालुका समन्वयक विनायक पवार, माजी विधानसभा संघटक साहेबराव (छोटु) पाटील, शेतकरी सेनेचे चंद्रसिंग ठाकूर, माजी तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील, माजी शहरप्रमुख सागर देसले, एस.टी.कामगार सेनेचे आर.आर.पाटील, नेवाडेचे सरपंच लक्ष्मीकांत साळुंके, अक्कडसे सरपंच रावसाहेब सैंदाणे, युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप पवार, युवासेना शहरप्रमुख योगेश माळी, सद्दाम तेली, संदीप राजपूत, राजेंद्र पवार, प्रकाश सोनवणे, विश्वास शिंदे, विक्की पाटील, दीपक पाटील, हिंमत कोळी, प्रमोद राठोड, भुषण पाटील, सरफराज खान, मनोहर जाधव, कार्यालय प्रमुख दिनेश साळुंके, स्वीय सहायक रुपेश मराठे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here