पिंपळकोठा पिंपरी बुद्रुक येथे कोरोना लसीकरण संपन्न

एरंडोल (विशेष प्रतिनिधी महेंद्र पाटील) – एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा पिंपरी बुद्रुक येथे कोरोना महामारीपासुन वाचण्यासाठी लसीकरण करण्यात आले कोरोनाचा प्रादुर्भाव आज जरी ओसरला असला तरी संभाव्य धोका टाळ्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे म्हणून सर्वांनी लस जरुर घ्यावी व आपल्यासोबत इतरांचीही काळजी करावी असे लस घेते वेळी पिंप्री बु येथील प्रगतीशील प्रौढ शेतकरी साहेबराव तुकाराम पाटील यांनी मत व्यक्त केले.

लस देण्यासाठी रिंगणगाव स्वास्थ्य केंद्र येथील डॉ. धीरज मराठे डॉ भगाळे सोबत आरोग्य सेविकासुनिता चौधरी सी एच ओ शेख मॅडम आरोग्य सेवक आंधळेआशा वर्कर अंगणवाडी सेविका वर्षा बावीस्कर आणि कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते एस आर पाटील बबलू पाटील.. अशोक भैय्या परवीन पाटील भाऊसाहेब पाटील फकीरा विसपुते श्रावण मोठा.. यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here