मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – सध्याच्या काळातील सर्वात सेक्सी आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये उर्वशी रौतेलाचा क्रमांक वरचा आहे. तिचा प्रत्येक फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालतो. कारण उर्वशीच्या चाहत्यांना दररोज तिच्या बद्दल काही ना काही नवीन जाणून घेण्याची इच्छा असते. अलीकडेच उर्वशीने क्लियोपेट्रा स्टाईलमध्ये स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने कपडे घातले नसून संपूर्ण शरीरावर चिखल लावला आहे. उर्वशीच्या या फोटोने लोकांचे लक्ष यासाठी वेधून घेतले कारण त्यात ती एकदमच बोल्ड व सेक्सी दिसते आहे आणि असे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचं धाडस खूप कमी मुली करतात.
उर्वशी रौतेलाच्या स्वच्छ सुंदर त्वचेमागे अनेक रहस्ये आहेत आणि त्यापैकीच एक रहस्य आहे मड बाथ! तिला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा ती वेगवेगळ्या किनाऱ्यावरची आणि गुणवत्ता असलेली माती किंवा चिखल गोळा करून तो आपल्या अंगावर लावते आणि आपल्या त्वचेला हिल करते. यावेळी सुद्धा तिने मड बाथ घेतला आहे. ही माती बेलिएरिक बीचची आहे. बेलिएरिक हे एक आयलँड मधोल बेट आहे. रेड मड हे खूप गुणवत्तापूर्ण असते, या मातीमध्ये अनेक प्रकारची खनिजे असतात जी त्वचेचा पोत सुधारुन त्वचेचा ग्लो वाढवतात.
उर्वशी म्हणते की बेलिएरिक बीचची रेड मड खनिजांनी समृद्ध असते त्यामुळे स्कीन थेरेपी साठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण मड बाथ हा सुंदरता वाढवण्याचा खूप प्राचीन उपाय आहे. याचे फायदे आणि त्वचेवर दिसणारे परिणाम आजच्या आधुनिक युगाला देखील भुरळ घालात आहेत. त्यामुळे हा प्रकार जरी किळसवाणा वाटत असला तरी खासकरून अभिनेत्री स्वत:ची सुंदरता जपण्यासाठी याचा आवर्जून वापर करत आहेत. मड बाथ मुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात असेही म्हटले जाते.






