ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – उल्हासनगर-४ येथील संतोषनगर शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाग १५ मधील जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम शासनाचे सर्व नियम पाळून संपन्न झाला.
शिवसेना कल्याण उपजिल्हा प्रमुख माननीय चंद्रकांत बोडारे,उल्हासनगरचे कार्यसम्राट नगरसेवक माननीय धनंजय बोडारे,नगरसेविका सौ.शितलताई बोडारे व सौ.वसुधाताई बोडारे,विभाग संघटक विजय सावंत,उपविभाग प्रमुख प्रा.प्रकाश माळी सर यांच्या हस्ते जवळपास २५० जेष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.
याप्रसंगी शाखा प्रमुख संभाजी चोरघडे,उपशाखा प्रमुख संजय शेलार,जेष्ठ नागरिक संघाचे कणसे काका,युवा सेना समन्वयक राजेश कणसे,प्रभागातील शाखा प्रमुख,उपशाखा प्रमुख,शिवसेना पदाधिकारी, युवा सेना व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






