उंब्रज (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार वैभव यादव हे चाफळ भागात पेट्रोलींग करत असताना रोडवर त्यांना एम.आय.नोटचा नाईन प्रो. मोबाईल सापडला त्यांनी सदर मोबाईलवरून सदर मोबाईल मालकाचा शोध घेऊन व त्यांचाच असल्याचा खात्री करुन तुषार रघुनाथ जाधव राहणार हेळगाव तालुका कराड यांना त्यांचा मोबाईल परत केला आहे.
पोलीसांनी तत्परतेने मदत केल्याबदल त्यांनी पोलीसांचे प्रामाणिक कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पोलीस अंमलदार वैभव यादव यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.






