उस्मानाबाद (प्रतिनिधी) – कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील एन.एस.एस, एन.सी.सी व क्रीडा विभागाच्या वतीने सोमवारी ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण जगभर २०१५ पासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग, योगासने, आणि योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आत्ता संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आल्यावर तर योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तरीही आपल्या दैनंदिन जीवनात योगाचे महत्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर सर यांनी शरीर आणि मन सक्षम आणि सुदृढ करण्यासाठी व्यक्तीला योगाची आवश्यकता आहे असे मत प्रतिपादन केले. यानंतर क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. अशोक कांबळे व डॉ. कपिल सोनटक्के यांनी योगाचे महत्व आणि योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे , नॅक समन्वयक डॉ. मनोज झाडे, डॉ. एस एस शिंदे, , प्रा. महेंद्र भालेराव, डॉ. संतोष पवार अधिक्षक श्री धनंजय पाटील प्रा. प्रशांत अमृतराव डॉ. एस एस राठोड, डॉ. यू एन भाले, डॉ. एच एम मिर्झा तसेच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वयंसेवक, कॅडेट, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. निलेश शेरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. रोहिणी महिंद्रकर यांनी मानले.






