मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ई-मेलद्वारे त्यानं ही धमकी दिली होती. पुण्यातील घोरपडीमधून या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या व्यक्तीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश शिंदे असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
Maharashtra | One arrested for sending fake threats via email to bomb Mumbai Mantralaya. He has been detained from Pune's Ghorpadi area and will be handed over to Mumbai police. Case registered at Mumbai's Marine Drive Police Station: Mumbai Police pic.twitter.com/RCnGv63JXc
— ANI (@ANI) June 21, 2021
सोमवारी संध्याकाळी शैलेशनं हा मेल केला होता. मुलीचं शाळेत अॅडमिशन न झाल्यानं त्यानं गृह विभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी संध्याकाळी हा मेल आल्यानंतर डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला, मात्र याठिकाणी कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आलेली नाही. मात्र, खबरदारी म्हणून या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.






