ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – लाॅकडाऊनच्या या काळात हल्ली ऑनलाईन सगळेच शिक्षण चालू आहे.विरंगुळा म्हणून आणि आपले छंद,आवड जोपासता यावी ,यासाठी साहित्यिकांचे व्हॉट्सअप ग्रुप अनेक आहेत.कल्याण येथील शब्दसुमने साहित्यिक मंच परिवाराच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त संस्थापिका अध्यक्षा संचालिका लेखिका कवयित्री अनिता प्रविण कळसकर यांनी रेडिओ एफ.एम.आणि शब्दसुमने साहित्यिक मंच यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक योगदिनाचे औचित्य साधून काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते.
महाराष्ट्,आणि महाराष्ट्र बाहेरून ही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा विषयच मुळात आरोग्य धन श्रेष्ठ हा होता.त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात आरोग्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण जीवन कशा पद्धतीने सुंदर बनवायचे, यावर अनेक कवी, कवयित्री यांनी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शैलीत काव्य लिहले होते.रचना वाचताना त्यातून प्रकट होणा-या भावनांची कदर आपण खरचं करायला हवी,तरचं जीवन जगणे सोपे आणि सुंदर होईल.असे प्रत्येकाला वाटतेय.खरंतर कविता ही आपल्या मनाचा आरसा असते.जसे मन विचार करते,तेच शब्द कागदावर रेखाटले जातात.जरी रचना लिहण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी भाव एकच असतात.तरीही अशा स्पर्धाचे परीक्षण हे ज्येष्ठ आणि जाणकार परीक्षकांकडून होणे गरजेचे असते.आणि शब्दसुमने साहित्यिक मंच, कल्याण .यांच्या या स्पर्धेला नेहमीच ज्येष्ठ ,श्रेष्ठ तसेच त्या त्या क्षेत्रातील मान्यवर परीक्षकच परीक्षण करतात , त्यामुळे या शब्दसुमने मंचाचे नाव आज महाराष्ट्राबाहेर ही गाजत आहे
शब्दसुमने साहित्यिक मंच च्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे परीक्षण रेडिओ पुणेरी १०७.८ आर.जे. कैलास यांनी पारदर्शकता ठेवून ,अनेक व्याप असताना ही सरांनी अगदी वेळात वेळ काढून निकाल दिला. या स्पर्धेत कोथरूड पुण्याच्या सौ.आशा मेलग् यांच्या आरोग्यलंकार या रचनेला सर्वोत्कृष्ट स्थान मिळाले. उत्कृष्ट डोंबिवलीच्या नीलम शिवगण आणि. नाशिकच्या सौ.अलका कोठावदे यांना मिळाला. तसेच प्रथम क्रमांक कोल्हापूर च्या स्वाती कोरगावकर आणि जुन्नरच्या वैशाली शिंदे यांना विभागून मिळाला.द्वितीय क्रमांक कल्याण च्या संचिता जोशी तसेच परभणीच्या प्रांजली भोसले यांना विभागून देण्यात आला.तृतीय क्रमांक मुंबई चे मयुर पालकर तसेच मलकापूरचे रिटायर्ड शिक्षक अरविंद कुलकर्णी यांना ही विभागून देण्यात आला.मुरबाडचे पेशाने शिक्षक असलेले कवी यशवंत माळी सर , आळंदी च्या शैला जांभळकर, परभणीच्या अयोध्या घोडके, कोथरूड च्या स्मिता सरमुकद्दम,ठाणेच्या प्रीती कारगावकर यांना देण्यात आले.सौ.संगीता पवार, नांदेडचे प्रल्हाद घोडबांद, कर्नाटक दावणगिरी च्या कविता किरण वालावलकर, कल्याणच्या विजया शिंदे, रायगडच्या संपदा देशपांडे यांच्या रचना भावस्पर्शी म्हणून सन्मानित केले.हृदयस्पर्शी रचनेमध्ये ठाणेच्या मानसी जोशी आणि अजय सोनार , पुण्याच्या अपर्णा दिघे, धुळ्याच्या वृंदा राव आणि मुंबई च्या मिनल बधान यांना सम्मानित केले.या स्पर्धेकरीता एकूण १०१रचना संपूर्ण देशातून आल्या होत्या. त्यामुळे स्पर्धा अजून रंजक बनत गेली
खरंतरं रचना सर्वांच्या अतिशय सुंदर अशा होत्या. कवितेचे परीक्षण करीत असताना रेडिओ एफ.एम.चे. आर जे. कैलास सर यांनी स्पर्धा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली म्हणून अनिता कळसकर यांचे अभिनंदन केले ,तसेच स्पर्धेत आलेल्या कविता या एकापेक्षा एक सरस होत्या असे मत व्यक्त केले , कविता वाचताना ज्या ज्या कविता आपल्याला भावतात.त्यातील लयबद्धता, आशय.विषय आणि संदेश याचा विचार करूनच क्रमांक दिले आहेत आपण वाचन करता करता अनेक गोष्टी शिकत असतो असे ही मत प्रकट केले ,तसेच त्यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून अजून ही आनंदाची गोष्ट सांगितली ती म्हणजे या शब्दसुमने साहित्यिक मंच परिवार,कल्याण च्या स्पर्धेतील सर्व सारस्वतांच्या या रचना रेडिओ पुणेरी एफ एम १०७.८वर ते ब्राॅडकास्ट करणार आहेत ,आणि सर्वांना एफृ.एम.तर्फे ऑनलाईन सन्मानपत्र ही दिले जाईल. तसेच शब्दसुमने साहित्यिक मंच परिवार. कल्याण च्या प्रसिद्ध लेखिका, कवयित्री अनिता कळसकर यांचे ही आभार व अभिनंदन केले .
सर्वांना अनिता कळसकर यांनी सुंदर असे ऑनलाईन सन्मानपत्र देऊन विजेते आणि सहभागी यांचे अभिनंदन केले, यावेळी शब्दसुमने साहित्यिक मंच परिवार चे सचिव हास्यकवी श्री .दीपकदादा आंबटकर,तसेच मार्गदर्शक ज्येष्ठ कवी श्री स़ंजय तांबे आणि मंचच्या संकलक सौ संचिता अमोल जोशी याचे मोलाचे सहकार्य या स्पर्धेकरिता मिळाले,आणि मंच परिवार चे ग्राफिक्सकार श्री.राहुल मुंढे यांनी सुंदर असे ग्राफिक्स बनवून सर्वाना एक सुखद धक्का दिला.अनिता कळसकर यांनी सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली म्हणून सर्वाचे अभिनंदन केले.सर्व स्पर्धकांनी अनिता कळसकर यांचे मनापासून आभार व्यक्त केले ,तसेच साहित्यिक क्षेत्रात सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.सगळीकडेच कल्याणच्या अनिता कळसकर या नेहमीच एक वेगवेगळी स्पर्धा घेतात म्हणून साहित्यिक यांनी त्यांचे अभिनंदन केले. लवकरच परत एक नवीन स्पर्धा आपण घेऊन येऊ ,असे आश्वासन अनिता कळसकर यांनी दिले.तसेच परीक्षक आर जे रेडिओ पुणेरी १०७.८यांनी शब्दसुमने साहित्यिक मंच ,चे परीक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार अनिता कळसकर यांनी व्यक्त करून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, असे लेखिका ,कवयित्री अनिता कळसकर, कल्याण यांनी सांगितले






