शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – येथील पतंजली योग समिती(हरिद्वार) तर्फे काल (दि.२१) सकाळी ६ वाजता शहादा येथील नवा मोहीदा रोड वरील श्री स्वामी समर्थ केंद्र शहादाच्या प्रांगणांत तालुकाध्यक्ष भरत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली योगाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात योगशिक्षक कैलास भावसार,किशोर चौधरी यांनी शासनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे प्रथम प्रार्थना म्हणून ८ते१०योगासने व ६ते ८ प्राणायाम बाबत सविस्तर माहिती देऊन फायदे बाबत योग्य ते मार्गदर्शन केले.यांवेळी योगशिक्षक मुकेश राजपूत,के.डी.गिरासे यांनीही योग व प्राणायाम पासून मानवजिवनासाठी होणारे परिणाम,फायदे यांबाबत मार्गदर्शन केले.अध्यक्ष भरतभाई यांनी पतंजली योग समिती हरिद्वारतर्फे योग व प्राणायाम यांचे प्रशिक्षण व सामाजिक कार्य बाबतीत सविस्तर माहिती दिली.

यावेळी जेष्ठ मार्गदर्शक रामभाऊ जाधव,माधव पाटील,पंजाब पवार डाक उपविभागीय अधिकारी शहादा,सुरेश सोनार,केडीगिरासे, मुकेश राजपूत यांचेसह जवळपास ४० साधकानी आंतरराष्ट्रीय योगदिनात भाग घेऊन कोविड १९चे नियमांचे पालन करून तोंडावर मास लाऊन,सुरक्षित अंतर ठेऊन सानेटायझरचा वापर करून योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे शहादा तालुक्यातील सर्व डाक विभागातीलअधिकारी,कर्मचारी,पोस्टमन हजर होते.यांवेळी उपस्थितांचे आभार व धन्यवाद देऊन प्रार्थना म्हणूनच कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






