शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – सोमवार (दि.२१) आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड नंबर १६, १० व १४ यांचे कोव्हिशिल्डचे कोरोना लसीकरण साईनाथ माध्यमिक विद्यालय येथे घेण्यात आले.
सकाळ पासून मान्यवरांनी आपली उपस्थिती साईनाथ विद्यालयात लावली.त्यामध्ये प्रामुख्याने शिर्डी शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष कैलास(बापु)कोते पाटील, विजयराव जगताप, गजानन शिर्वेकर, ताराचंद कोते, उत्तमभैय्या कोते, राजेंद्र कोते, रमेशराव कोते, साईराज कोते, रविंद्र विलासराव कोते, अशोक गायके, सलिमभाई शेख, विठ्ठलराव शिंदे, वैभव शिंदे, बापुसाहेब शिंदे, बंडु वाणी, प्रशांत कोते, प्रशांत गोंदकर, बाळासाहेब गोर्डे, अशोक शिंदे, श्री.जाधव, तान्हाजी गोंदकर,राजेंद्र बनकर व इतर मान्यवरांनी लसीकरण केंद्राला भेट दिली.
लसीकरण ४५ वर्षे व त्यावरील नागरिकांसाठी होते.लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.लसिकरण करतांना राहाता ग्रामिण रुग्णालयाच्या नर्सेस, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, शिर्डी नगरपंचायतचे सर्व अधिकारी व कर्मचारी,नामदार राधाकृष्ण विखे यांच्या कार्यलयातील कर्मचाऱ्यांनी लसीकरण यशस्वीतेसाठी परिश्रम केलेत. या सर्वांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष शिवाजीभाऊ गोंदकर, दत्तुभाऊ कोते, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






