नांद्रे शिवारातील दारुची हातभट्टी नष्ट; मेहुणबारे पोलिसांची कारवाई

चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील नांद्रे शिवारातील मन्याड नदीच्या पात्रातील झाडा-झुडप्यात अवैद्यरित्या सुरु असलेली गावठी हातभट्टी मेहुणबारे पोलिसांनी छापा टाकुन उद्धवस्त केली आहे. या ठिकाणी ४०० लिटर गुळ, नवसागर मिश्रीत गरम पाणी, साठ लिटर गावठी पक्की दारु यासह इतर रसायने आणि इतर साहित्य असा एकूण ७४ हजार ४०० रुपये किंमतीचे साहित्य आढळून आले होते. ते पोलिसांनी जागेवरच नष्ट केले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

नांद्रे शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याची गुप्त माहिती माहिती मेहूणबारा पोलीस स्टेशनचे ए. पी.आय. पवन देसले याना मिळाली. त्या अनुषंगाने एपीआय पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मिलींद शिंदे, संजय पाटील, गोरख चकोर, शैलेश माळी आणि होमगार्ड महेंद्र पवार अशांच्या पथकाने नांद्रे येथे छापा टाकला असता, या छाप्यात पोलीसांना मन्याड नदी काठावरील झुडपात गावठी हातभट्टीची दारु बनवतांना गणेश बन्सी सोनवणे रा. नांद्रे हे गावठी हातभट्टीची दारु तयार करतांना मिळुन आले.

त्याच्या ताब्यातून जवळपास ४०० लिटर गुळ, नवसागर मिश्रीत गरम पाणी, साठ लिटर गावठी पक्की दारु यासह इतर रसायने आणि साहित्य असा एकूण ७४ हजार ४०० रुपये किंमतीचे साहित्य आढळून आले. यावेळी पोलीसांनी जागीच गावठी दारु उत्पादीत करणारी भट्टीची तोडफोड करीत रसायने जमीनदोस्त केले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here