मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई – मुंबई महापालिकेच्या राजावाडी येथील रुग्णालयातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याचं समोर आलं आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्यानंतर महापौर किशोरी पेंडणेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, रुग्णाच्या डोळ्याच्या पापण्यांचा आणि आसपासचा भाग कुरतडला गेला आहे. अतिशय खेदजनक गोष्ट आहे. आयसीयू वॉर्ड सर्व बाजूंनी बंद आहे. कुठुनही उंदीर जाणार आहे याची खबरदारी घेतलेली आहे. पण वॉर्ड तळाला असल्याने आणि पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कदाचित हा उंदीर आयसीयूत गेला असावा, असा अंदाज पेडणेकर यांनी लावला.

वॉर्डमधील रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याने निश्चितच त्याला याबाबत काही जाणवलं नसेल. ही गोष्टी नर्सच्या लक्षात आल्याने लगेचच डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी केली. ही संपूर्ण घटना गंभीर आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे महापौर पेडणेकर यांनी म्हटलं.

श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे दिसून आले. या प्रकऱणी सुरुवातीला डॉक्टरांनी उद्धट उत्तर दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सुरक्षेचे उपाय केले जातील, असं येथील अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here