शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून साकीनाका मायलेकाची आत्महत्या

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – साकीनाका येथे मायलेकाने बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेश्मा ट्रेनचिल ऊर्फ रेश्मा सरत मुलुकुटला (४४), गरुड सरत मुलुकुटला (१०) अशी मृत मायलेकांची नावे असून शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी याच इमारतीच्या ११ व्या मजल्यावर राहणाऱ्या शादाब अयुब खान याला अटक केली आहे.

साकीनाक्याच्या नाहर अमृत शक्ती येथील तुलिपिया अपार्टमेंटमध्ये रेश्मा या मुलासोबत राहत होत्या. मे महिन्यात रेश्मा यांच्या पतीचा करोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे रेश्मा प्रचंड नैराश्यात होत्या. आज रात्री रेश्मा आणि त्यांच्या मुलाने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही माहिती समजताच साकीनाका पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्या दोघांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

साकिनाका पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. यामध्ये रेश्मा यांनी आत्महत्येमागील कारण लिहिले आहेत. रेश्मा या राहत असलेल्या फ्लॅटच्या खालील मजल्यावरील फ्लॅटमध्ये अयुब खान, शेहनाज खान आणि शादाब खान हे राहतात. त्यांच्या वावरण्याचा आम्हाला त्रास होतो. हे कुटुंब वारंवार सोसायटी आणि पोलिसांकडे तक्रार करतं. यामुळे मानसिक त्रास झाल्याने जीवन संपवत असल्याचे रेश्मा यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. यावरून गुन्हा दाखल करून साकीनाका पोलिसांनी शादाब याला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here