शिर्डी (शहर प्रतिनिधी) – आज राहाता तालुका शिवसेनेच्या वतीने श्री साईबाबा संस्थांच्या प्रशासकीय अधिकारी पदी राजेंद्र सोपानराव जगताप पा. व संजय मुरलीधर जोरी यांची नियुक्ती झाल्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शिवसेना नेते कमलाकर कोते पा., तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे पा., शहरप्रमुख सचिन कोते पा., राहुल गोंदकर, महेश महाले, जयराम कांदळकर, विलास कोते, सुनील बारहाते, अनिल पवार, नवनाथ विश्वासराव, संतोष जाधव, विजय जगताप, बाळासाहेब जगताप, हरिराम रहाणे, अमोल गायके, बाळासाहेब जेजुरकर, सचिन बोर्डे, संतोष कु-हाडे, शरद मोरे, संतोष देसाई यांच्या अनेक शिवसैनिक उपस्थित होते.






